आरएसएसच्या शाखेवर दगडफेक; अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

ही घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Sudarshan MH
  • Mar 11 2025 11:11AM
कल्याण: खंबाळपाडा परिसरात चौधरी वाडी मैदानात भरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखेवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
 
खंबाळपाडा येथील चौधरी वाडी मैदानामध्ये आरएसएसची ही वीर सावरकर शाखा गेल्या काही महिन्यांपासून भरत आहे. याठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांना प्रशिक्षण दिले जाते. दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत या मैदानावर बालसंस्कार शिबिर आयोजित केले जाते. ज्याठिकाणी मुलांना विविध खेळ आणि शारीरिक प्रशिक्षण दिले जाते.
 
रविवारी रात्री या शाखेत नेहमीप्रमाणे मुलांचे सराव सत्र सुरू असताना अचानक मैदानात दगड येऊन पडण्यास सुरुवात झाली. अचानक घडलेल्या त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीही याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर टिळकनगर पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार