*नंदुरबार शहर व तालुक्यात सरकारी यंत्रणा पाठशी धरून शेकडो एकर जमीन भूमाफियांच्या गळ्यात,जिल्हाधिकारी सो दखल घेतली काय? सुदर्शन न्युज चा खडा सवाल*
जिल्हाधिकारी सो दखल घेतली काय? सुदर्शन न्युज चा खडा सवाल*
नंदुरबार शहर व तालुक्यात भु माफियांच्या व महसूल, तहसील व जिल्हा उद्योगकेंद्र याच्या काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या संगमताने शेकडो एकर कुलकायद्याच्या व इनामी जमीन भूखंड माफियांच्या घशात लोटले आहे ,
सदर जमिनी ह्या बोगस व बनावट औदयोगिक प्रयोजन हेतू कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडवून व शासनाची फसवणूक करून गिळंकृत केले असल्याचे पुरावे सुदर्शन न्युज ला प्राप्त झाले असून सदर पुरावयाच्या अनुशनगे लवकरच माननीय जिल्हाधिकारी सो. मनीषा खात्री व विभागीय महसूल आयुक्त तथा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य याना सादर करण्यात येईल व या भूखंड माफियांच्या सर्व अनधिकृत जमिनी शाशन दरबारी जमा होऊन, सदर भूखंड माफिया व कर्तव्यभ्रष्ट अधिकाऱ्यां वर तात्काळ गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही व्हावी हा सूर जनतेतून उमटत आहे