बैलपोळा मोठ्या आनंद उत्साहात साजरा
बैलपोळा
बैलपोळा म्हंटला तर शेतकरी आणि त्याच्यासोबत राबराब राबणारा त्याचा सर्जा राजा अर्थातच बैल आजचा दिवस हा शेतकरी संपूर्णतः आपल्या सर्जा राजाला देत असतो बैलपोळा साजरा करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावात अगदी दुष्काळ परिस्थितीतही त्या खांद्याला खांदा लावून शेतात राब राब राबणाऱ्या सर्जा राजाला दुष्काळाची झळ न लागू देता कोपर्ली गावातील शेतकऱ्यांना बैलपोळा मोठ्या आनंद उत्साहात साजरा केला शिवाजी चौकातून या बैलपोळा उत्सवाची सुरुवात करण्यात आली. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिंगारदे यांच्या हस्ते श्रीफळ चढवून या बैलपोळा सणाची सुरुवात करण्यात आली कोपर्ली गावचे सरपंच विनोद वानखेडे उपसरपंच प्रशांत गिरासे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते या बैलपोळा उत्सवात शंभर बैलजोडी अन 40 ट्रॅक्टरचा समावेश होता सुरुवातीला सहवाद्य वाजत गाजत गावातून 100 बैल जोड्यांची मिरवणूक पार पडली यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने 40 ट्रॅक्टरची मिरवणूक देखील गावातून काढण्यात आली होती यामुळे दुष्काळाच्या काळातही शेतकरी राजाचा बैलपोळा सणानिमित्त चेहऱ्यावर काही काळ हास्य समाधान पहावयास मिळालं