तळोदा येथील १८ वर्षीय तरुणाने हातोडा पुलावरून उडी मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नदीत उडी घेतल्याचे

एकच खळबळ उडाली आहे. नदीत उडी घेतल्याचे

Sudarshan MH
  • Aug 4 2023 5:31PM
तळोदा प्रतिनिधी!! (राहुल शिवदे)

तळोदा येथील १८ वर्षीय तरुणाने हातोडा पुलावरून उडी मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नदीत उडी घेतल्याचे नागरिकांना दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने नदी दुभडी भरून वाहत असल्याने अद्याप मृतदेह आढळून आलेला नाही. नदीत उडी का घेतली याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. उडी घेतलेल्या तरुणाच्या शोधासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. 

               बुधवार दि. ०२ ऑगस्ट साय. ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ओजस सुनिल सोनार वय १८ वर्ष रा. जैन वाडी समोर असे पाण्यात उडी घेणाऱ्या  मुलाचे नाव आहे. तो जैन वाडी समोर कुटूंबीयांसह राहत होता. बुधवारी अचानक तो मोटार सायकल घेवून घरून निघून गेला. बराच वेळ झाला, परंतू घरी आलाच नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. ८ वाजे दरम्यान त्याचा मित्र साहिल जोहरी याने भ्रमण्वनीद्वारे ओजसने  हातोडा पुलावरून पाण्यात उडी मारली असल्याचे सांगितले. सदर शब्द कानी पडताच त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला. तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याचे निकटीय असलेले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद सोनार, हीतेश सोनार, प्रमोद सोनार, योगेश सोनार, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, विजय मराठे यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ओजस याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. २४ तास होऊन देखील ओजसचा कुठेही तपास लागला नाही. याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी गुजरात राज्यातील निझर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तपास यंत्रणा युद्ध पातळीवर ओजसचा शोध घेण्याचे काम करत आहे.....
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार