मराठा आरक्षणासाठी दिल्ली म्हदे सात जूनला मराठा महासंघाचे आंदोलन
केंद्र सरकार ने घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे:- संभाजी दहातोंडे
मुंबई : मराठा समाजाला २०१४ साली १६ टक्के व त्यांनतर २०१९ मध्ये १२-१३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. दोन्ही वेळा ५० टक्केचा वर मर्यादा वाढवून दिलेले आरक्षण कोर्टात टिकले नाही. त्यामुळे आता ५० टक्केचे आत आरक्षण द्या किंवा घटना दुरुस्ती करा. काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली पुर्नयाचीका देखील फेटाळली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी दिल्ली येथे सात जूनला मराठा महासंघाचे आंदोलन केले जाणार असे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप व राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले. घटना दुरुस्ती करून 50% च्या आत आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे म्हणाले की, केंद्र सरकारच्या स्थरावर महाराष्ट्रातील मराठा समाज, हरीयानाचा जाट समाज, राजस्थानचा राजपूत समाज, कर्नाटकांचा राज्यू समाज, मनीयार समाज, पटेल समाज, काही अंशी कुर्मी समाज व इतर आरक्षणापासून आरक्षण वंचीत समाज यांना सुध्दा आरक्षणाचा फायदा मिळावा हीच आमची भूमिका आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाण्यास विलंब लागणार असेलतर धोरणात बदल करुन आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजासह देशातील सर्व वंचित समाज घटकांना नोकरी, शिक्षण यामध्ये आरक्षण धावे अशी मागणी अ.मा. मराठा महासंघ करीत आहे.
५० टक्केच आत आरक्षण असले पाहिजे अशी जनभावना मराठा महासंघाची आहे. तरच ते सुप्रिम कोर्टात टिकेल किंवा घटना दुरुस्ती करावी. सततची आंदोलने, मोर्चे बंद यांचा झालेला अति वापर यामुळे आज सामान्य मराठा समाजातील कार्यकर्ते चळवळीपासुन दुर होत आहेत व समाजांची भावना देखील निराषामय झाली आहे.
या दिल्लीतील आंदोलनासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्हातून मराठा समाज बांधव जाणार आहे. आज मुंबई येथे मराठा महासंघाची बैठक संपन्न झाली, या वेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय सरचीटणीस संभाजीराजे दहातोंडे, संतोष नानवटे, श्रीरंग बरगे, रणजित जगताप, परशुराम कासुळे, अॅड, गजेंद्र भोसले, शशिकांत पिसाळ, आदि पदाधिकारी उपस्थित होते.