हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचा प्रश्नवर खेड-आळंदी विधानसभेचे चे आमदार दिलीप मोहिते चा विधानसभेत लक्षवेधी

आमदार दिलीप मोहिते पाटलांनी यांनी हु.शिवराम राजगुरु स्मारकाबाबत लक्षवेधी उपस्थित केली.

Deepak Chavhan
  • Mar 14 2023 4:19PM

मुंबई -महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, हु.भगतसिंह,हु.सुखदेव यांचा बलिदान स्मरण दिन दि.23 मार्च रोजी देशभर साजरा होत आहे. या धर्तीवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हु.शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेल्या हु.राजगुरु स्मारकाची लक्षवेधी मांडून संपूर्ण सभागृहाचे लक्ष या विषयाकडे वेधले.

 हु.राजगुरु,भगतसिंह,सुखदेव यांनी अगदी तरुण वयात 23 व्या वर्षी हसत-हसत फासावर जाऊन या देशासाठी बलिदान दिले. हया बलिदानातून आपण आजचे स्वातंत्र्य अनुभवत व उपभोगत आहोत. 

पुणे जिल्हयातील खेड-राजगुरुनगर हे हु.शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मगाव येथे हु.राजगुरु यांची जन्मस्थळ व राजगुरुवाडा आहे.शासनाने याला संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिलेला आहे. परंतु अजूनही गेली अनेक वर्षे म्हणजेच 75 वर्षे देशाच्या स्वातंत्र्याला होऊन देखील हु.राजगुरु यांचे भव्य-दिव्य स्मारक उभे राहू शकलेले नाही.गेल्या कित्येक वर्षांपासून याबाबतच्या निधीच्या घोषणा झाल्या. परंतु निधी प्रत्यक्षात मिळालाच नाही.

यापूर्वी शासनाने हु.राजगुरु स्मारक विकास आराखडा केला मात्र 86.25 कोटी रु.चा आराखडा हा कागदावरच राहिल्याने आता त्याच आराखडयाची किंमत 130 ते 150 कोटी रु.पर्यंत गेलेली आहे. शासन हया बलिदान स्मरण दिनाला शासन निधी देऊन या हुताम्यांना श्रध्दांजली देणार का ? असा प्रश्न खेड-आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधान सभेत उपस्थित केला. त्याला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2 महिन्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांची समितीवर नेमणूक करुन या राजगुरु स्मारक विकास आराखडयाला मान्यता देणार असे सांगितले. त्याचबरोबर जो अधिकारी यात कुचराई करील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यांत येईल असे आश्वासन सभागृहाला दिले.

याबाबत विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांनी यात बोलताना विकास आराखड्यात या अधिवेयानात निधी देणार का? तसेच बलिदान दिन व जयंती साजरी करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देणार का? त्याचबरोबर हु. राजगुरु यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणार का? असे प्रश्न उपस्थित केले. याला अतुल भातखळकर (भाजप,प्रवक्ते) यांनी देखील पाठींबा दर्शविला. या विकास आरखड्याचा टप्पा तयार करुन त्याचा कालावधी पूर्ण होईल हे तरी मंत्री महोदय या सभागृहाला आश्वासित करतील का? 
काल दिवसभरात हु. राजगुरु स्मारकाची लक्षवेधी सभागृहात गाजल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास राजगुरु प्रेमी यांना वाटत आहे. लक्षवेधी नंतर आमदार दिलीप मोहिते पाटील व आमदार ॲङ अशोक बापू पवार व राजगुरुनगर येथील हु. राजगुरु प्रेमी कार्यकर्ते ॲङ निलेश आंधळे, मधुकर गिलबिले गुरुजी, शुभम सोनवणे, सिद्धार्थ कांबळे, दिलीप बनसोडे, मयुर कानवडे, आदि कार्यकर्ते यांनी मंत्रालय येथील हु. राजगुरु चौकात जाऊन स्मारकाला निधी उपलब्ध मिळणेबाबत निदर्शने करण्यांत आली.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार