ग्रा.पं निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले! नंदुरबारात ४२ ग्रा.पं.वर भाजपा
तर २८ ग्रा.पं.वर शिंदे गटाचा दावा
नंदुरबार - नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावीत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कमळ फुलले असुन दि.१९ सप्टेंबर रोजी सोमवारी झालेल्या मतमोजणीत भाजपने सर्वाधिक ४२ ग्रा.पं जिंकल्याचा दावा केला आहे.तर शिवसेना शिंदे गटाने २८ ग्रा.पं.वर सत्ता स्थापन केल्याचा दावा आहे.
नंदुरबार तालुक्यातील ७२ ग्रा.पं.निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.यापूर्वी ६ ग्रा.पं.बिनविरोध झाल्या आहेत. दि.१८ सप्टेंबर रोजी रविवारी ६६ ग्रा.पं साठी मतदान झाले. दि.१९ सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता नंदुरबार येथे जीटीपी कॉलेज रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला निकाल आमराई ग्रा.पं.चा जाहीर झाला. त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले.
निकालात भाजपने ४२, शिंदे गटाने २८ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ व अपक्षांनी ४ ग्रा.पं वर विजय मिळविल्याचा दावा केला आहे.
यंदाच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच व सदस्य पदासाठी निवड करण्यात आली.
पथराईत २ भाऊ समोरासमोर
पथराई ग्रा.पं निवडणुकीत दोन भावांच्या गटात लढत पहायला मिळाली. यात शिंदे गटातील शेखर पाटील हे विजयी झाले तर त्यांचे भाऊ वसंत पाटील व रवी पाटील यांना पराभव पत्करावा लागला.
दुधाळे ग्रा.पं.मध्ये मंत्र्यांची पुतणी पराभूत
दुधाळे ग्रा.पं निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची पुतणी तथा नंदुरबार पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश गावीत यांची मुलगी प्रतिभा जयेंद्र वळवी यांना लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. याठिकाणी शिंदे गटातील अश्विनी प्रकाश माळचे ह्या सरपंचपदी ५४१ मतांनी विजयी झाल्या.
ईश्वर चिठ्ठीत भाजप उमेदवार विजयी
नंदपूर ग्रा.पं निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढून कौल घेतला असता त्यात भाजपच्या रोहिणी गुलाबसिंग नाईक यांचा विजय झाला.तर शिंदे गटातील सुनीता योगेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला.
आष्टे ग्रा.पं.मध्ये पं.स.उपसभापतींचा पराभव
आष्टे ग्रा.पं.मध्ये नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांच्या गटाचा पराभव झाला असून भाजपने येथे सत्ता स्थापन केली आहे.
भाजपचा गटातील ग्रा.पं दावा
बालआमराई,अजेपूर,आष्टे,सुतारे,बिलाडी,आंबापूर,ढेकवद, धिरजगाव,नवागाव,जळखे,काळंबा,पातोंडा,नागसर, श्रीरामपूर,शिरवाडे,वडझाकण, मंगरुळ,मालपूर,गुजर भवाली,लोय,पावला,कोठली,निमगाव,वसलाई,वागशेपा,शिवापूर,व्याहूर,इंद्रीहट्टी,वासदरे, नळवे बु.नळवे खुर्द,सुंदरदे, उमर्दे बु.,खोडसगाव,चाकळे,पळाशी,कोळदे, शिंदे,चाकळे, नारायणपूर, गंगापूर,फुलसरे.
शिंदे गटातील ग्रा.पं दावा
अजेपूर,बिलाडी,हरिपूर,खामगाव,टोकरतलाव,आर्डीतारा,विरचक, वाघाळे, राजापूर,निंबोणी,धुळवद,भोणे,वेळावद,नंदपूर,दुधाळे,दहिंदुले बु.,दहिंदुले खुर्द, पिंपरी,धमडाई,वसलाई,करजकुपे,नांदर्खे,लहान शहादा,होळ तर्फे हवेली,