मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ

मराठा विद्या प्रसारक समाज नागपूर च्या वतीने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ

Snehal Joshi .
  • Oct 4 2020 12:03AM
दरवर्षी प्रमाणे *दि.२ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती* निमित्त कोविड - १९च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून मराठा समाजातील वर्ग १० व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ संस्थेचे अध्यक्ष *श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले* यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रारंभी *श्रीमंत छत्रपती राजे शिवाजी महाराज भोसले* विद्येची देवता *शारदा माता* व *राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाल बहादूर शास्त्री* यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रम कोविड -१९ चे अनुषंगाने सामाजिक अंतर ठेऊन नियोजनबध्द पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य सचिव *श्री. डॉ. प्रकाश मोहिते* यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सदस्य *श्री.निलेश चव्हाण* यांनी केले. सदर कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी *सर्वश्री प्रशांत भोसले, विलास वाघ, दिलीप सस्ते, शिरीष राजे शिर्के, प्रविण शिर्के, बाळासाहेब गायकवाड, अनुप जाधव, हेमंत शिर्के, लक्ष्मीकांत किरपाने* इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार