१२ ते १४ मार्च खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित --नितीन गडकरी

विदर्भात उद्योग व निर्मातही होत आहे. पण १६ टक्के वाहतूक खर्च येतो तो कभी व्हावा, फायनल फिनिश प्रॉडक्ट तयार करून मग निर्यात सर्वथा परवडेल. विदर्भाच्या विकासासाठी सर्व घटकांना एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील विदर्भ विकासाच्या उद्देशानेच खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून विदर्भातील सर्व खासदार, आमदार व तोकप्रतिनिधींना जोडले जाणार आहे. केंद्रीय MSME मंत्री नारायण राणे, राज्याचे मंत्री सुभाष देसाई व इतर सर्व मन्यानाही निमंत्रित करण्यात आले आहे.

Snehal Joshi .
  • Mar 7 2022 3:38PM
संपूर्ण विदर्भाचा विकास व्हावा, या उद्देशाने
येत्या १२ ते १४ मार्चता खासदार औद्योगिक
महोत्सव आयोजित केला असल्याचे केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी  पत्रकार परिषदेत
स्पष्ट केले.

ते म्हणाले की, ७५ टक्के खनिज व ८० टक्के
वन विदर्भात आहे. विदर्भ सक्षम आहे, पण
ताळमेळ नाही. पुढील दहा वर्षांचा विचार करावा
लागेल. उद्योग वाढतील तसे रोजगार वाढतील व
विदर्भाचा विकास होईल. विशेषतः सुक्ष्म, लघु व
मध्यम उद्योगात कमी माडवती खर्चात
रोजगाराच्या मोठ्या संधी असून, त्यामुळे ग्रामीण
व मागास भागाच्या औद्योगिकीकरणातही मदत
होते. उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत
रचना हव्यात. त्या जाता होत आहेत.

विदर्भात उद्योग व निर्मातही होत आहे.
पण १६ टक्के वाहतूक खर्च येतो तो कभी
व्हावा, फायनल फिनिश प्रॉडक्ट तयार करून
मग निर्यात सर्वथा परवडेल. विदर्भाच्या
विकासासाठी सर्व घटकांना एकत्र येऊन
प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील विदर्भ
विकासाच्या उद्देशानेच खासदार औद्योगिक
महोत्सव आयोजित करण्यात आला  असून
विदर्भातील सर्व खासदार, आमदार व
तोकप्रतिनिधींना जोडले जाणार आहे. केंद्रीय
मंत्री नारायण राणे, राज्याचे मंत्री सुभाष देसाई व
इतर सर्व मन्यानाही निमंत्रित करण्यात आले
आहे. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विद्यार्थी
उद्योजक व व्हीआए, एनव्हीसीसी व संघटनांचा
सहभाग आहे. यासह सर्वांचेच सहकार्य अपेक्षित होते
असल्याचे गडकरी म्हणाले.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संचालक
पी. एम. पार्लेवार यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हिंगणा
औद्योगिक वसाहतीमधील पी-२६. एमआयए
हाऊस येथे १२ ते १४ मार्च हा खासदार
औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला
असून, सार्वजनिक उपक्रम, एमएसएमई, स्टार्ट
अप्स आर्दीसह विविध क्षेत्रातील उद्योग
कंपन्यांची १५० दालने राहतील शासकीय
अधिकारी, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, बहुराष्ट्रीय
कंपन्यातील अधिकारी विविध विषयांवरील
परिसंवादात माहिती देतील. पत्रकार परिषदेला
खा. अशोक नेते. एमआयडीसी इंडस्ट्रीज
असोसिएशनचे अध्यक्ष सी. जी. शेगावकर व
इतर उद्योजक, एमएसएमई अधिकारी उपस्थित.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार