काँग्रेसने गोमंतकीयांची माफी मागावी

गोव्यातील खाण व्यवसाय काँग्रेसच्या काळात बंद झाला आहे. त्यावेळी राज्यात दिगंबर कामत यांचे तर देशात मनमोहन सिंग यांचे सरकार होते. खाण व्यवसाय बंद होण्यास कारणीभूत असल्याचे कबूल करून काँग्रेसने गोमंतकीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा भाजपाचे प्रभारी सी टी रवी यांनी केले.

Snehal Joshi .
  • Feb 12 2022 11:04PM

पणजी, दि. १२ :
गोव्यातील खाण व्यवसाय काँग्रेसच्या काळात बंद झाला आहे. त्यावेळी राज्यात दिगंबर कामत यांचे तर देशात मनमोहन सिंग यांचे सरकार होते. खाण व्यवसाय बंद होण्यास कारणीभूत असल्याचे कबूल करून काँग्रेसने गोमंतकीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा भाजपाचे प्रभारी सी टी रवी यांनी केले.

येथील निवडणूक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, खोटे बोल पण रेटून बोल, ही काँग्रेसची परंपरा आहे. गेल्या साठ वर्षांत त्यांना जमले नाही ते भाजपाने केवळ दहा वर्षांत करून दाखवले. भाजपा जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्याचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर मांडले आहे. केलेल्या विकासकामांचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर आणणारा भाजपा हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत श्री. रवी म्हणाले, राहील गांधींना कोणत्याही विषयाचा अभ्यास नसतो. म्हणूनच ते भाजपवर टीका करण्यात धन्यता मानतात. राज्यातील खाण व्यवसाय त्यांच्याच काळात बंद पडला, हे ते सोयीस्करपणे विसरले आहेत. राज्यातील कोळसा हब विषयी राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना श्री. रवी म्हणाले, आम्हालाही पर्यावरणाची जाण आहे. गेल्या दहा वर्षांत देशात आणि राज्यात आम्ही पर्यावरपुरक उद्योग उभारण्यासाठी प्राधान्य दिले.

आज देशात भाजपाचे सरकार आहे. यामुळे विकास साधायचा असेल तर राज्यातही भाजपचेच सरकार यायला हवे. तरच वेगाने विकास होऊ शकतो. कारण गाडीला आपण एका बाजूला बैल आणि एका बाजूला रेडा बांधू शकत नाही. अन्यथा गाडी पाण्यात जाणार हे नक्की. यासाठी तमाम गोमंतकीय जनतेचे भाजपाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आम् आदमी पार्टी आणि तृणमूल विषयी ते म्हणाले, हे दोन्ही पक्ष भाजपा द्वेष्टे आहेत  राज्यातील भाजपची मते फोडण्यासाठी ते गोव्यात दाखल झाले आहेत. लोकांना विविध आमिषे दाखवून न झीपणारी आश्वासने देत सुटले आहेत, अशी टीका श्री. रवी यांनी केली.

विरोधकांनी देशातील आणि राज्यातील विकास उघड्या डोळ्यांनी पाहावा. मगच बोलावे. गोवा सरकारने गेल्या दहा वर्षांत केंद्रातील भाजपा सरकारच्या सहकार्याने मोठा विकास केला आहे. तिसरा मांडवी पूल, झुआरी पूल, राज्यातील सरकारी इस्पितळांतील अत्याधुनिक सोयी - सुविधा, गोवा - मुंबई महामार्गाचे रुंदीकरण, आय आय टी हब, मोपा विमानतळ, किनारपट्टीवरील स्वच्छता गृह इतर साधन सुविधा, राज्य महामार्गाचे रुंदीकरण, प्राथमिक शाळांच्या इमारतींची बांधणी अशी कैक कामे आम्ही केली. तरीही विरोधकांना ती दिसत नसतील त्यांनी आपले डोळे तपासून घ्यावेत, असा टोला श्री. रवी यांनी हाणला. तुमची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने डॉ. प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी टाकली. डॉ. सावंत यांनी मिळालेल्या अल्प कालावधीत अतिशय चांगले काम केले आहे. कोरोना महमारीच्या कठीण परिस्थितीतही त्यांनी आपले कार्य कुशलता दाखवून दिली आहे. ही निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. स्वाभाविकपणे आगामी काळात राज्याचे नेतृत्व तेच करतील.

विरोधक राज्यात अंटीन्कंबन्सी आहे, असे म्हणत आहेत. याविषयी तुमचे मत काय? असे विचारले असता ते म्हणाले, कसली अंटीन्कंबन्सी आणि कोणाविरुद्ध? भाजपा सरकारने केलेली विकासकामे इतकी प्रचंड केली आहेत की अंटीन्कंबन्सीचा प्रश्नच नाही. केवळ पायाभूत सुविधांच नव्हे तर केंद्र असो व राज्य सरकारच्या सर्व सामाजिक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य डॉ. सावंत यांच्या सरकारने केले आहे. मग अंटीन्कंबन्सी असण्याचे कारण नाही. यामुळे गोमंतकीय जनता आम्हाला प्रचंड मतांनी निवडून देईल, अशी खात्री टी सी रवी यांनी व्यक्त केली.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार