पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत व स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा निर्माण करण्यासाठी केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता हवी . नावेली मतदारसंघात भाजप निवडून येणे कठीण नाही. त्यासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधून भाजपचे उमेदवार उल्हास तुयेकर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण भाजपला सत्तेवर येण्यासाठी प्रत्येक आमदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे. आणि उल्हास तुयेकर यांना निवडून आणावे. असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज केले.
नावेली मतदार संघाचे भाजपचे उमेदवार उल्हास तुयेकर यांच्या प्रचारार्थ आज नावेली मतदारसंघांमध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये जे.पी. नड्डा बोलत होते .यावेळी केंद्रीय मंत्री जी कीशन रेड्डी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर, उमेदवार उल्हास तुयेकर , भाजपाचे प्रवक्ते उर्फान मुल्ला , भाजपाचे मुस्लिम नेते शेख जिना , दक्षिण गोवा भाजप पदाधिकारी सत्यविजय नाईक. नावेली भाजपचे पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जे पी नड्डा म्हणाले इतर पक्षांसाठी विकास ही फक्त घोषणा आहे .तर भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाजप. हे आता ठरून गेलेले आहे. भाजपकडे नेता आहे , निती आहे नम्रता आहे. आणि नव्यानं काहीतरी निर्माण करण्याची शक्ती आहे. इतर पक्षाकडे ते नाही आणि यासाठीच केंद्रात आणि गोव्यात भाजप सत्तेवर यायला हवा. असेही नड्डा म्हणाले.
भाजपने कधीही जातीचे धर्माचे राजकारण केले नाही. अल्पसंख्यांकाचा वापर काँग्रेसने फक्त मतासाठी केला. तर भाजपने सर्वसामान्य अल्पसंख्यांकाना व गरीबाना अनेक योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे .
भाजप सर्वांच्या विकासाचं काम करतो असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला बलशाली केले .अनेक योजना सुरू केल्या .आयुष्यमान भारत , सुलभ शौचालय, उजाला योजना आदी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना दिलेला आहे. गरिबासाठी केंद्रात गोव्यातही अनेक योजना राबवल्या जात आहेत. अनेक विकास प्रकल्प गोव्यामध्ये उभे आहेत. मोपा विमानतळ, जुवारी फुलासारखे अपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भाजप गोव्यात पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी उल्हास तुयेकर निवडून येण्याची गरज असल्याचेही नड्डा म्हणाले. गरिबांना सामाजिक सुरक्षा देण्याचे काम फक्त भाजप ने केले आहे. सबका साथ सबका विकास या ध्येयाने भाजप नेहमीच काम करणार असून सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले . गोव्यात मानव विकास करून गोव्याचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोल्डन गोवा करण्यासाठी प्रमोद डॉक्टर प्रमोद सावंत अथक प्रयत्न करत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी नावेलीतून भाजपचा विजय व्हायला हवा. असे सांगून प्रत्येकाने गोव्याचा आणि देशाचा विकास समोर ठेवावा आणि अफवांना बळी न पडता भाजपला मतदान करावे असे आवाहन शेवटी जे पी नड्डा यांनी केले .
याप्रसंगी बोलताना नरेंद्र सावईकर यांनी सांगितले की गोव्याचा आणि नावेली चा विकास होण्यासाठी नावेलीतील मतदारांचा आधार भाजपला हवा आहे .उल्हास तुयेकर सोज्वळ आणि सभ्य उमेदवार असल्यामुळे आणि डबल इंजिनच्या माध्यमातून विकास होण्यासाठी ते निवडून येणे गरजेचे आहे . भाजप जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो ते आपण गेल्या दहा वर्षांमध्ये पाहिलेले आहे. आणि त्यासाठी भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने जिंकू गरजेचे असल्याचे सावईकर म्हणाले .
भाजप जाती-धर्माचे राजकारण करत नाही. सर्व धर्मांचा विकास करतो. अल्पसंख्यांकाचे हीत फक्त भाजप करू शकतो हे सिद्ध झालेले आहे. त्याच्यासाठी उल्हास तुयेकर यांना भरघोस मतांनी निवडून द्या. असे आवाहन भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केले .
नावेली वासियांच्या सेवेसाठी आणि नावेली वासियांना हवा असलेला नावेली मतदारसंघ करण्यासाठी आपणास आमदार म्हणून सेवा करण्याची संधी मतदारांनी द्यावी असे आवाहन तुयेकर यांनी केले. भाजपाने गेल्या अनेक वर्षांमध्ये गोव्यामध्ये मुस्लिम समाजाच्या हितासाठी केलेल्या कामाचीक्षमाहिती शेख जीना यांनी दिली. व तुयेकर यांच्या रूपाने नावेलीतून पहिल्यांदाच भाजपाचा उमेदवार यावेळी निश्चित निवडून येणार असल्याचे सांगितले . इतर मान्यवरांची ही समयोचित भाषणे झाली. नावेली पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात भाजपला समर्थन मिळत असल्याचे या जाहीर सभेवरून दिसून आले.