पणजी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दिनांक ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४. वा.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उत्तर गोव्यातील भाजप कार्यकर्ते व हितचिंतकांना मार्गदर्शन करणार आहेत. एकाच वेळी उत्तर गोव्यातील २० ठिकाणी हे मार्गदर्शन होणार असून या वीस ठिकाणी खास मोठ्या स्क्रीन लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी भाजपाने ज्या २० ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्या स्थळांची यादी जाहीर केली असून या स्थळावर जे भाजपाचे नेते उपस्थित राहतील त्यांचीही यादी जाहीर केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे....
मांद्रे - जिल्हा पंचायत हॉल - सुनील राणे .
पेडणे येथे येथील भाजपाचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्या वडिलांचे निधन झालेले असल्यामुळे तेथे कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही .
डिचोली - दीनदयाळ सभागृह - राहुल नार्वेकर.
थिवी - ग्रीन यार्ड हॉल थिवी - श्रीपाद नाईक.
म्हापसा - भाजपा उत्तर गोवा कार्यालय - राम सातपुते.
शिवोली - जनार्दन मनेरकर यांचेघर - राम शिंदे .
साळगाव- पंचायत हॉल गिरी - राजू कुडची
कळंगुट -भाजप कार्यालय- समाधान अवधाते.
पर्वरी - स्नेह बटिक हॉल पर्वरी - लक्ष्मण सौदी.
हळदोणा - सावीयो मार्टीन यांच्या घरी - दामू नाईक
पणजी - भाजप निवडणूक कार्यालय सरस्वती मंदिर पणजी - सुभाष शिरोडकर
ताळगाव - आमदार बाबूश मोन्सेरात यांचे निवासस्थान - निलेश काब्राल.
सांताक्रुज - मेरशी पंचायती जवळ- माविन गुदिन्हो .
सांत आंद्रे - लवंदे सभागृह आगशी - नरेंद्र सावईकर.
कुंभारजुवा - आमदार पांडुरंग मडकईकर यांचे निवासस्थान - योगेश सागरे
मये - चोडण पंचायत हॉल- संजय पाटील.
साखळी - रवींद्र भवन साखळी - या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व प्रभारी सि टी रवी हे उपस्थित राहणार असून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानंतर थेट चर्चाही होणार आहे.
पर्ये - सुंदरम हॉल होंडा - अभय पाटील.
वाळपई - आमदार विश्वजित राणे यांचे कार्यालय वाळपई - किशन रेड्डी .
प्रियोळ - बिग बी हॉल बेतकी - देवेंद्र फडणवीस .
तरी वरील ठिकाणी त्या-त्या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित रहावे. व पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा .असे आवाहन प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.