वन नरेंद्र मोदी,भारताचे पंतप्रधान आज जगाचे नेतृत्व करतात.

राज्यात भाजपला निवडून देणे म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे आहे. हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी 2014 च्या आधी आणि 2014 नंतर जागतिक दर्जात देशाचे काय आणि किती महत्त्व वाढले आहे आणि त्याला कारण काय आहे. हे सांगण्याचा प्रयत्न केला.

Snehal Joshi .
  • Feb 2 2022 1:21AM

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण   ज्यांचे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी  गोव्यात आगमन झाले. वेर्णा येथील श्री म्हाळसा देवीचे दर्शन घेऊन ते दाबोळी  मतदारसंघात प्रचारासाठी  सहभागी झाले.

राज्यात भाजपला निवडून देणे म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे आहे.  हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी 2014 च्या आधी आणि 2014 नंतर  जागतिक दर्जात  देशाचे काय आणि किती महत्त्व वाढले आहे आणि त्याला कारण काय आहे. हे सांगण्याचा प्रयत्न केला. 

ते म्हणाले मी पूर्वी परदेशात जायचो, काँग्रेसचे सरकार असताना, आम्ही भारतातून आलो आहोत, असे म्हणायचे तेव्हा लोक पाठ फिरवायचे.
भारतीयांचा आदर कधी केला गेला नाही, स्वाभिमानाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात  नव्हते आणि भारताची चर्चा  तेव्हा भ्रष्टाचाराच्या बाबतीत व्हायची.

पण, त्यानंतर 2014 मध्ये मोदीजी पंतप्रधान झाले आणि मी जगात कुठेही गेलो तेव्हा चारही बाजूंनी एकच आवाज यायचा, मोदीजी!

 पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण जगात भारताचा सन्मान आणि स्वाभिमान वाढवला! खरच अभिमान वाटतो, भारताचे पंतप्रधान आज जगाचे नेतृत्व करतात , आम्ही  बोलत नाही काळ  बोलतो.

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतात *वन सन, वन वर्ल्ड वन ग्रिड आणि वन नरेंद्र मोदी* आणि हे  कौतुकास्पद आहे. ही स्तुती फक्त नरेंद्र मोदीजींचीच नाही तर 130 कोटी भारतीयांची आहे, आज देश कुठे पोहोचला आहे.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार