गोव्यात अमित शहांच्या प्रचार तोफेने विरोधक गारद

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना मोठ्या मंत्र्यांची केंद्रात वेळ घ्यायला अपॉइंटमेंट साठी वाट पहावी लागली नाही. असेही अमित शाह यावेळी म्हणाले गोव्याच्या मायनिंग संदर्भात डॉ. प्रमोद सावंत प्रश्न घेऊन दिल्लीत येत आहेत आपले सरकार आल तर नक्कीच आपण त्यावर काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले. गोव्याचा विकास भाजप करेल, पहिलेही भाजपने गोव्याचा विकास केला, मी इथे सगळा हिशोब घेऊन आलो आहे, असे म्हणत अमित शाह यांनी गोव्यात केलेले काम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Snehal Joshi .
  • Jan 31 2022 12:59AM

पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला  आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा विधानसभा  मतदार संघात उतरल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह आज गोव्यात प्रचाराला पोहोचले आहेत. तर गोवा वर  पुन्हा  भारतीय जनता  पार्टीचाच ध्वज फडकविण्याची जबाबदारी प्रभारी देवेंद्र फडणवीसांवर देण्यात आली आहे. गोव्यात देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेते   मुक्कामी आहेत. यावेळी प्रचारसभेत अमित शाह यांनी पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख  केला आहे. केंद्रात भाजपने काय काय काम केलं आणि डबल इंजिन च्या माध्यमातून राज्यात काय काय काम झालं हे शाह यांनी जनतेला सांगत मतदारांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली व म्हणाले गृहमंत्र्यांचे महत्त्वाचे पद सोडून ते परत गोव्याचे मुख्यमंत्री झाले कारण त्यांचं गोव्यावर पदापेक्षा जास्त प्रेम होतं.

संपूर्ण भारताचा नकाशा पाहिला तर गोवा हे छोटेसे राज्य, गोव्यात येवढ्या सगळ्या पार्टी का आहेत? ज्या नव्या पार्ट्या येथे आल्या आहेत त्या गोव्याचा विकास  करु शकत नाही.  काँग्रेस होते तेव्हा सरकार असच  अस्थिरता, अराजकता आणि भ्रष्टाचार म्हणून ओळखल जात.  तस आपण गोव्यात पण पाहिलं, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

देशाच्या नकाशात गोवा हे राज्य छोट  दिसतं, पण मी म्हणतो  की माँभारतीच्या ललाटावर ज्याप्रमाणे टिळा शोभून दिसतो तसा गोवा आपल्या देशात  शोभून दिसतो, गोव्याचा विकास, आणि लोकांना रोजगार फक्त भाजप देऊ शकते, सरकार फक्त भाजप बनवू शकते.

मोदीजींना गोव्याला २ हजार ५६७ कोटी दिले, मोदींजींची नीती आहे, प्रदेश जेवढा छोटा तेवढा विकास जास्त, भाजप सरकार मध्ये कधीही मुख्यमंत्री  डॉ.प्रमोद सावंत यांना मोठ्या मंत्र्यांची  केंद्रात वेळ घ्यायला अपॉइंटमेंट साठी वाट पहावी लागली नाही. असेही अमित शाह यावेळी म्हणाले गोव्याच्या मायनिंग  संदर्भात डॉ. प्रमोद सावंत प्रश्न घेऊन दिल्लीत येत आहेत. आपले सरकार आल तर  नक्कीच आपण त्यावर काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले. गोव्याचा विकास भाजप करेल, पहिलेही भाजपने गोव्याचा विकास केला, मी इथे सगळा हिशोब घेऊन आलो आहे, असे म्हणत अमित शाह यांनी गोव्यात केलेले काम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना आला तेव्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलणी करत होतो,  डॉ.प्रमोद सावंत यांनी गोव्याला सुरक्षितता प्रदान केली आहे. स्टार्टअपला गोव्यात प्रोत्साहन दिले. वेगळ्या पार्टी आल्यात त्यांना विचारा, गोव्याला का देणार? ते वचन यासाठी देत आहेत कारण त्यांना माहिती आहे की सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळे वचन देण्यासाठी दारिद्र का दाखवावे .  आपण दिलेल्या जाहीरनामा तील वचने पूर्ण करावे लागणार नाही, असा टोलाही शाह यांनी लगावला आहे. जर  इतर कोणाचे सरकार बनले तर अस्थिरता वाढेल,भ्रष्टाचार बोकाळेल.

मोदीजींच्या सरकारने गरींबांच्या घरात शौचायलय असावे त्यासाठी काम केले.
 धुर मुक्त  स्वयंपाक घर करून स्त्रियांना त्रास मुक्त केलं.
विधवांना सहाय्यता निधी गोवा सरकारने दिली.  सगळे काम सांगत गेलो तर 7 दिवसांचा  भागवत सप्ताह  सारखा वेळ लागेल असेही शाह म्हणाले. 

 उरीवर हल्ला केला तेव्हा आतंकवाद्यांना वाटले असावे की हे  मनमोहन सिंगांचे गप्प सरकार आहे, मात्र मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक  करून  प्रतिउत्तर दिलं, मोदीजींनी भारताला सुरक्षित करण्याचे काम केले, राहुल गांधींची पार्टी करु शकते का?  देशाला सुरक्षित करू शकत का ? असा सवालही शाह त्यांना विचारा की गोव्याला हे काय देणार?. वचन...

कार्यक्रमाच्या शेवटी सवाल-जवाब करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की मी डिजिटल इंडियातील मंत्री आहे.  लॅपटॉप उघडून मी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतो तेव्हा बाकीचे प्रश्नांची उत्तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर विचारा मी माझ्या परीने सगळ्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

4 Comments

vega

  • Sep 27 2022 3:41:03:317PM

vega

  • Sep 27 2022 3:40:58:697PM

vega

  • Sep 27 2022 3:40:55:637PM

vega

  • Sep 27 2022 3:40:54:670PM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार