उत्पल पर्रीकर भा ज प सोबत नाहीत याचं दु:ख... देवेंद्र फडणवीस

उत्पल पर्रीकरांना तिकीट नाकारलेलं नाही. त्यांना दोन मतदारसंघ आम्ही दिले होते. त्यातला एक भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ होता. पण त्यांना पणजी मतदारसंघच हवा होता. त्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघांना त्यांनी नकार दिला. ते आमच्यासोबत नाहीत याचं आम्हाला दु:ख आहे.

Snehal Joshi .
  • Jan 30 2022 8:34AM
  1. उत्पल पर्रीकर यांना भाजपानं उमेदवारी नाकारली नव्हती असा दावा आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “उत्पल पर्रीकरांना तिकीट नाकारलेलं नाही. त्यांना दोन मतदारसंघ आम्ही दिले होते. त्यातला एक भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ होता. पण त्यांना पणजी मतदारसंघच हवा होता. त्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघांना त्यांनी नकार दिला. ते आमच्यासोबत नाहीत याचं आम्हाला दु:ख आहे. पण भाजपा हा देशव्यापी पक्ष आहे. त्यामुळे तो मार्गक्रमण करतच राहणार आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले. गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याशिवाय, पक्ष सोडून गेलेले पुन्हा परत आले, तर त्यांचं स्वागत करू, असंही ते म्हणाले. “आमची इच्छा तर ही नेहमीच असेल की आमच्या परिवारातून जर कुणी विभक्त झालं असेल तर त्यांनी परत यावं. तसे प्रयत्न नेहमीच चालतात. पण कुणी ठरवलंच असेल की आपल्याला परत यायचंच नाही, तर आमच्याही प्रयत्नांना सीमा आहे. पण अशा प्रकारे जर कुणी परत आलंच, तर आम्ही त्यांचं स्वागत करू”, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.

 
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार