खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शानदार प्रारंभ
केंद्रीय मंत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव - 2021 चे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू झाला
खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शानदार सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवरांनाही सुखविंदर सिंह यांनी 'प्यार की झप्पी' दिली आणि 'जिनके सर हो इश्क की छॉंव ..... चल छैय्या छैय्या' या गीताच्या माध्यमातून नागपूरकरांवर प्रेमाचा वर्षाव केला.
केंद्रीय मंत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव - 2021 चे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू झालेल्या या महोत्सवाला 'मुन्नाभाई' फेम बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्यक्ष मा. प्रा. अनिल सोले, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार दत्ता मेघे, विजय दर्डा यांच्यासह आमदार, माजी आमदार व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, कोरोनाचा दोन वर्षाचा काळ कठीण होता. अनेक आप्तजनांना मुकलो. देवाच्या आशीर्वादाने आपण त्यातून बाहेर निघालो. त्यामुळे नियमांचे पालन करायचे आहे. साहित्य, संस्कृती, कला, इतिहास ही आपल्या समाजाचा ताकद असून ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ही शक्ती आहे. पण केवळ शक्तीच्या भरोशावर समाजाला पुढे नेत असताना साहित्य, संस्कृतीला विसरू शकत नाही. कलाकारांना सन्मान व्हावा, नवीन पिढीपर्यंत हे संस्कार पोहोचावे म्हणून आहे हा खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू केला.
नितीन गडकरी यांनी संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांच्या मैत्रीचा उल्लेख करताना संजय दत्त यांनी अनेक संकटांचा सामना केला पण आपली माणुसकी सोडली नाही, असे सांगितले. सुनील व नर्गिस दत्त यांचे चित्रपट सृष्टीत मोठे योगदान असल्याचे सांगितले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल वसंत खंडेलवाल व चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. साची अरमरकर या मुलीने संजय दत्त यांचे केलेले पोर्टेट त्यांना भेट दिले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.
..............
साहित्य, कला, संस्कृती चा महायज्ञ - नितीन गडकरी
साहित्य, संस्कृती, कला हे समाज संस्कार, समाज प्रबोधनाचे साधन आहे. त्यातून आपल्या चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. खासदार सांस्कृतिक महोत्सव हा साहित्य, संस्कृती व कलेचा हा यज्ञ आहे. आपण त्यात सहभागी होऊन आहुती देतो आहोत. हा महोत्सव लोकांना प्रेरणा देईल, भावी पिढीला संस्कार देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांस्कृतिक महोत्सव केवळ नागपुरापर्यंत मर्यादित न राहता तालुका स्तरावर पोहोचावा, त्यासाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
..........
कैसे हो मामू...
'मुन्नाभाई', 'संजु' अशा अनेक चित्रपटामधून आपल्या अभिनयाने लोकप्रियतेचा शिखर गाठलेले सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी 'कैसे हो मामू...' अशा शब्दात नागपूरकर रसिकांची चौकशी केली आणि आपल्या खास दमदार शैलीतील डॉयलॉगबाजीने रसिकांची मने जिंकली. देशासाठी, लोकांसाठी आणि विकासासाठी काम करणारे वडील संजय दत्त यांच्यानंतरचे नितीन गडकरी हे दुसरे नेते मी पाहिले. नितीनजी माझे मोठे भाऊ आहे. त्यांच्यासाठी माझी 'जान हाजिर है' असे सांगताना संजय दत्त यांनी 'मुन्नाभाई' चा तिसरा पार्ट लवकरच काढला जावा आणि त्यासाठी नागपूरकरांनी राजू हिरानी यांना गळ घालावी, अशी विनंती केली. येरवडा तुरुंगात असताना तेथील हवालदारांनी मराठी शिकवायचे खूप प्रयत्न केले पण मी शिकू शकलो नाही, अशी कबूली देताना संजय दत्त्र यांनी आपल्याला भाषण देत नाही. त्यामुळे केवळ डायलॉगच म्हणणार आहे, असे उत्तरप्रदेशचा एक किस्सा सांगत सांगितले. 'संजू' चित्रपटातल्या इतर सर्व गोष्टी विसरून जा. आईवडिल आणि मोठ्यांचा सन्मान कसा करायचा, हाच धडा घ्या, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.