पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणांमधील खऱ्या सूत्रधारांना गजाआड करा!पिंपरी- चिंचवड शहर भाजपाची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले निवेदन
प्रतिनिधी:-पुणे
पुणे:- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या भ्याड हल्यातील खरे सूत्रधार मोकाट फिरत आहेत. या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा वापर करून भ्याड हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी रात्री अटक झाली आहे. परंतु, या प्रकरणातील खरे सूत्रधार अजूनही मोकळे फिरत आहेत. या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आज करण्यात आले.
यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी घुले,शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, आरपीआय आठवले गट प्रदेश सरचिटणीस चंद्र्कांता सोनकांबळे, आरपीआय शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे,स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडीगेरी, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे उपस्थित होते.
सखोल चौकशी करा : आमदार लांडगे
याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. अशा भ्याड हल्ल्याचे कोणत्याही स्तरातून समर्थन होऊ शकत नाही. राजकारण राजकारणाच्या जागी करावे. उगाच कोणताही षड्यंत्र रचू नये. अशी माझी मनःपूर्वक प्रार्थना आहे आणि भावना देखील आहे. मात्र, जाणीवपूर्वक असे प्रकार शहरात घडवून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रकार केला जात आहे.म्हणून या प्रकाराचा मी तीव्र निषेध व्यक्त करत आहे.याची चौकशी तातडीने आणि सखोल व्हावी अशी मागणी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना आज करण्यात आली आहे.