ज्ञान, भक्ती व कर्मयोगाचा त्रिवेणी संगम असलेला कर्मयोगी हरपला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची शोक संवेदना

श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनाने ज्ञान, भक्ती व कर्मयोगाचा त्रिवेणी संगम असलेले कर्मयोगी हरपला आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

Sudarshan MH
  • Aug 5 2021 10:49AM
नागपूर, ४ आॅगस्ट - श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनाने ज्ञान, भक्ती व कर्मयोगाचा त्रिवेणी संगम असलेले कर्मयोगी हरपला आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. 
शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिर संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे आज निधन झाले.  शिवशंकर पाटील यांनी केवळ शेगावच्या श्री गजानन मंदिर परिसराच्या विकासाचा विचार केला नाही तर शेगावला येणाºया भक्ताच्या सोईसुविधांचाही तेवढाच विचार केला. त्यामुळे शेगावच्या गंजानन मंदिर परिसरातील  स्वच्छता, तेथील शिस्त व प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून केलेले बदल शिवशंकर पाटील यांच्यामुळे   शक्य झाले. शेगावमध्ये गेलेल्या भक्तांना कधीही त्रास झाला नाही. त्यांना व्यवस्थापनाच्या क्षेत्राची उपजतच अद्भूत दृष्टी होती. त्यांची श्री गजाजना महाराजांच्या प्रती जितकी भक्ती होती. तेवढीच आपुलकी त्यांची शेगावला येणाºया भक्तांविषयी होती. त्यामुळे शिवशंकर पाटील यांच्या विषयी प्रत्येक गजानन भक्ताच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण झाले आहे. शेगाव मंदिर परिसरातील व्यवस्थापनाची अनेक बिझनेस स्कूलने दखल घेतली आहे. व्यवस्थापनाचे कोणतेही शिक्षण न घेतलेल्या शिवशंकर पाटील यांनी भक्तांना येणाºया अडचणी व त्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे शिवशंकर पाटील यांच्याबद्दल भक्तांशिवाय एक वेगळा चाहता वर्गही निर्माण झाला आहे.  
केवळ मंदिर परिसरातपुरते ते मर्यादित राहिले नाही तर शेगावच्या विकासातही त्यांनी मोलाची भर टाकली आहे. शेगावचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे राज्यातील एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणू नावारुपाला आलेले आहे.  शेगावला येणाºया भक्तांच्या पर्यटनासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. आनंद सागर सारखा १०० एकरामध्ये पसरलेला परिसर पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित केला आहे. यातून त्यांची शेगाव परिसराचा विकास करण्याची तळमळ दिसून येते. या प्रकल्पांमुळे शेगाव परिसराचा विकास होण्यास मदत झाली आहे.  शेगाव हे गाव पर्यटनाच्या क्षेत्रातील एक उत्कृष्ट स्थळ म्हणून नकाशावर आलेले आहे, असेही डॉ. नितीन राऊत यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार