म न पा चा कार्यक्रमात गडकरी यांनी केले तुकाराम मुंडे यांचे कौतुक. म्हणाले कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं.
नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर मनपाने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरातील आमदारांनी चांगले काम केल्याची पोचपावती दिली.
नागपूर: कोरोनाच्या काळात नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगले काम केले, अशी प्रशंसा नितीन गडकरी यांनी केली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. यामध्ये भाजपचे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी आणि संदीप जोशी आघाडीवर होते. याच वादातून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीही झाली होती. मात्र, आज नितीन गडकरी यांनीच तुकाराम मुंढे यांचे कौतुक केल्याने अनेकांना मिश्किल हसू आले.
नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर मनपाने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरातील आमदारांनी चांगले काम केल्याची पोचपावती दिली. तसेच महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा व जन शक्तीच्या माध्यमातून शहिदांच्या नावाने हॉस्पिटल चालविण्याचे आव्हान केल्यानंतर आगामी काळात नागपूर महानगरपालिकेने औषधी बँक तयार करावी. या बँकेत अत्यावश्यक औषधांचा साठा असावा, ही काळाची गरज आहे. अशी सूचनाही यावेळी गडकरी यांनी केली.