भिवंडीतील गोदामात सापडले ७ बांगलादेशी; हस्तक बनवून देतात अगदी ५ - ७ हजारांत भारतीय नागरिक!

भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील एका गोदामात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या ७ बांगलादेशी घुसखोरांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jan 2 2025 5:11PM
मुंबई: बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर तिथली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बांगलादेशी घुसखोर मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असलेल्या ७ बांगलादेशींना पकडण्यात आले आहे. महिन्याभरात पकडण्यात आलेल्या घुसखोरांची संख्या ३० वर गेली आहे.
 
भिवंडीत अवैधरित्या राहात असलेले बांगलादेशी हे हस्तकांना ५ ते ७ हजार रुपये देऊन भारतात येतात. हेच हस्तक त्यांच्यासाठी भारतातील पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर बोगस कागदपत्रं तयार करून देतात. पुरुषांना बांधकामावर काम मिळते तर बारमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी तारुणींकडून हस्तक १० ते १५ हजार रुपये घेतात, अशीही माहिती समोर आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व बांगलादेशी बेकायदेशीरपणे मानकोली येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील बी - ६ मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता गोदाम क्र. २०५ मध्ये सापळा रचून सर्वांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता, वरील हे सर्व अवैधपणे बांगलादेश सीमेवरून भारतात येवून भिवंडीत राहात होते. ७ जणांवर पोलीस शिपाई काशिनाथ पांडुरंग ठोमरे यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५०, कलम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ परिच्छेद ३ (१), विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेले बांगलादेशी हे प्लंबर म्हणून तर काही बांधकामावर मजुरीचे काम करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची नावे पुढील प्रमाणे -
 
इमोन अरसद खान (२८),
मोहंमद फजरअली जोसेफउददीन (५४),
इआनुल इकलाज मंडल (२६),
डॉली शाहीद अन्सारी (३५),
राणी कासिम शेख (२८),
लीमा हमीन खान (२६),
शिवली अब्दुलरज्जाक कलाम (२७)
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार