‘तांडव’च्या विरोधात कारवाई होणार--- गृहमंत्री अनिल देशमुख
देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून त्यावर नियमानुसार करवाई होईल; पण ‘ओटीटी’ म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पुरवण्यात येणारी सुविधा.यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
‘तांडव’ वेब सिरीजच्या निर्मात्यांच्या विरोधात कारवाई करण्यास मुंबई पोलिसांना महाराष्ट्र राज्य सरकार रोखत आहे. हे महाविकास आघाडी सरकार हिंदुविरोधी आहे, असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. या वेब सिरीजच्या विरोधात राम कदम यांनी घाटकोपर येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच सुदर्शन टीव्ही च्या एका विशेष कार्यक्रमात ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे’, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. या ठिय्या आंदोलनाच्या वेळेस घाटकोपर येथील चिरागनगर पोलिसांनी राम कदम यांना कह्यात घेतले होते.संतांच्या भूमीतच संतांचा अपमान होत आहे. या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान झाल्याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत; मात्र निर्मात्यांच्या विरोधात अद्याप गुन्हाही
नोंद करण्यात आला नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे’, असा आरोप राम कदम यांनी परत एकदा केला आहे.
‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये देवतांचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. ‘देवतांचा अपमान करणार्यांवर जर सरकारने ४८ घंट्यांत कारवाई केली नाही, तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू’, अशी चेतावणी त्यांनी सरकारला दिली आहे. यावर उत्तर देत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कीदेवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून त्यावर नियमानुसार करवाई होईल; पण ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप मिडिया सर्व्हिस – म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पुरवण्यात येणारी सुविधा) कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे