राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील

अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बुधवारी दिली.

Snehal Joshi .
  • Jan 6 2021 9:41PM
अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रदेश माध्यमविभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्याचे सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभानसिंह पवैय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवस मुंबईत पक्षाची कोअर कमिटी, प्रदेश पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष इत्यादींच्या बैठका झाल्या. बैठकांमधील निर्णयांची माहिती मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथील भव्य मंदिरात आपला वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने नागरिकांकडून निधी संकलन करण्यात येणार आहे. भाजपा निधी संकलनासाठी सक्रीय मदत करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मंदिर निर्मितीसाठी दहा दहा रुपये गोळा करतील. त्यासाठी बूथ पातळीपासून सर्वांची योजना पक्षाच्या मुंबईतील बैठकीत निश्चित करण्यात आली. त्यांनी सांगितले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणूक निकालांची समीक्षा बैठकीमध्ये करण्यात आली. शेवटच्या तासात संशयास्पद रितीने मतदान वाढणे, पदवीधर नसलेल्यांची नावे मतदारयादीत असणे, खूप मोठ्या प्रमाणात कोऱ्या मतपत्रिका आढळणे असे अनेक गैरव्यवहार झाल्याचे या निवडणुकांमध्ये आढळले आहे. त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. ते म्हणाले की, पक्षाचे 28 नेते आगामी तीन दिवसात राज्यभर प्रवास करणार आहेत. राज्यातील 14,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आढावा घेऊन निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पक्षातर्फे मदत करण्याची योजना हे नेते निश्चित करतील. राज्यात लवकरच होणाऱ्या 92 नगरपालिका - नगरपंचायती व 5 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बैठकांमध्ये विचार झाला.
1 Comments

Good work

  • Jan 6 2021 10:28:27:470PM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार