मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार

मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे. ३ वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिली.

Snehal Joshi . सौजन्य- हिंदु जनजागृती समिती,
  • Jan 3 2021 11:44PM

मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे. ३ वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिली.

ट्रस्टने सांगितले की, ५ एकर जागेमध्ये बांधले जाणारे हे मंदिर ३ मजली असणार आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असेल. या बांधकामासाठी साधारण ४०० वर्षांपर्यंत तग धरेल अशा सिमेंटचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या दर्शनी भागात २२ पायर्‍या असतील, तर ज्येष्ठ आणि विकलांग नागरिकांसाठी उद्वाहन आणि सरकते जिने यांचीही सुविधा असणार आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला ६५ एकर क्षेत्रामध्ये विविध बांधकामे केली जाणार आहेत.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार