राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मा.मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचा जन्मदिन
जन्म. ११ डिसेंबर १९१५
एक नि:स्वार्थ, निरपेक्ष, संयमी पण धडाडीचे विवेकी आणि चैतन्यशील नेतृत्व अशी श्री. बाळासाहेबांची प्रतिमा होती. बाळासाहेब वयाच्या ११ व्या वर्षी शाखेत रुजू झाले आणि संघरूप झाले. परंपरा आणि आधुनिकता यांचा प्रगतीपर संगम त्यांच्या नेतृत्वात होता.
जन्म. ११ डिसेंबर १९१५
एक नि:स्वार्थ, निरपेक्ष, संयमी पण धडाडीचे विवेकी आणि चैतन्यशील नेतृत्व अशी श्री. बाळासाहेबांची प्रतिमा होती. बाळासाहेब वयाच्या ११ व्या वर्षी शाखेत रुजू झाले आणि संघरूप झाले. परंपरा आणि आधुनिकता यांचा प्रगतीपर संगम त्यांच्या नेतृत्वात होता. हे नेतृत्व निरहंकारी होते, पण त्याचवेळी देशाचे भवितव्य संघाच्या द्वारे घडविण्याचा दुर्दम्य आत्मविश्वारस त्यांच्या ठायी होता." बाळासाहेबांचे नाव मधुकर देवरस, मात्र ते बाळासाहेब नावाने अधिक परिचित होते. गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर १९७३ साली त्यांनी संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत संघाला एक नवी दिशा मिळाली आणि संघाने पूर्वांचल राज्यातून वनवासी क्षेत्रांतून सेवाकार्याला सुरुवात केली. त्यांनी २१ वर्ष सरसंघचालकपद भूषविले.भारतीय विचार साधना ने बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची महती विषद करणारे पुस्तक निर्माण केले आहे. शरद हेबाळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मा.बाळासाहेबां वरील हे पुस्तक म्हणजे ७० वर्षांचा संघाचा इतिहास आहे, असे म्हटले तर काहीच वावगे ठरणार नाही. त्यांचा स्वयंसेवक - सरसंघचालक हा प्रवास 'श्री बाळासाहेब देवरस' ह्या पुस्तकातून मांडला गेला आहे. *मा. बाळासाहेब देवरस* यांचे १७ जून १९९६ रोजी निधन झाले.
*मा. बाळासाहेब देवरस* यांना विनम्र अभिवादन!