देशातील गोपनिय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना पुरवत असल्याचा ठपका असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरांचा जामीन अर्ज फेटाळला

कुरुलकर ई - मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

Shruti Patil
  • Dec 8 2023 1:18PM

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला देशाची गोपनिय माहिती पुरवल्याच्या आरोपांखाली डीआरडीओचे वैज्ञानिक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कुरुलकरांनी जामीनासाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज कुरुलकरांनी फेटाळून लावला आहे. देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला पाठविल्याचा आरोपावरून डॉ. प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहेत. 

 

डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखवण्याची तयारी दर्शवली होती, असं त्यांच्या व्हॉटस्अप चॅटमधून स्पष्ट झालं. डॉ. कुरुलकर यांनी अ‍ॅड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. कुरुलकर यांनी मोबाईलमधील काही डाटा डिलीट केला आहे. तसेच, जप्त करण्यात आलेला एक मोबाईल नादुरूस्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी तो गुजरात येथे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.

दरम्यान, डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखवण्याची तयारी दर्शवली होती, असं त्यांच्या व्हॉटस्अप चॅटमधून स्पष्ट झालं होतं. दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून हे चॅट समोर आलं होतं.

कुरुलकर ई - मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार