किर्तांगळी गावातील प्रत्येक तरुण व तरुणी ही दुसरा सुरेश चव्हाणके तयार व्हावी-- सुरेश चव्हाणके

सिन्नर तालुक्याती किर्तांगळी हे श्री. संत हरिबाबा यांच्या तपसाधनेच्या आध्यात्मिक स्पंदनांनी पवित्र झालेल गाव आहे याच गावाचे सपुत्र सुदर्शन राष्ट्र निर्माण संघठन चे अध्यक्ष व सुदर्शन न्यूज चैनल चे चैरमन श्री सुरेश चव्हाणके यांची ही कर्मभूमि किर्तांगळी गाव हे त्यानी सुदर्शन राष्ट्र निर्माण च्या माध्यमातून दत्तक घेतले आसुन गावाला एक आदर्श गाव बनवण्याची त्यांची संकल्पना आहे

Sudarshan MH
  • Dec 17 2021 9:41AM
नाशिक....सिन्नर तालुक्याती किर्तांगळी हे श्री. संत हरिबाबा यांच्या तपसाधनेच्या आध्यात्मिक स्पंदनांनी पवित्र झालेल गाव आहे याच गावाचे सपुत्र सुदर्शन राष्ट्र निर्माण संघठन चे अध्यक्ष व सुदर्शन न्यूज चैनल चे चैरमन श्री सुरेश चव्हाणके यांची ही कर्मभूमि  किर्तांगळी गाव हे  त्यानी सुदर्शन राष्ट्र निर्माण च्या माध्यमातून दत्तक घेतले आसुन गावाला एक आदर्श गाव बनवण्याची त्यांची संकल्पना आहे त्यानी गावातील जिल्हापरिषद  शाळेच्या इमारतीसाठी मोठे योगदान प्रदर्शन राष्ट्रनिर्माण च्या माध्यमातून केले असून त्या शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन करण्यासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून हेलीकॉप्टर द्वारा किर्तांगळी गावाला पोचले व त्यांच्या हस्ते
शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन करण्यात आले त्याच बरोबर श्री सुरेश चव्हाणके यांच्या गावतील संरपच,ग्रामस्थ,हिंंदू संघट, व, शाळेचे शिक्षक,विद्यार्थी,च्यावतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी श्री सुरेश चव्हाण यांनी गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित केले...

..या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलताना चव्हाणके म्हणाले की गावाचं भौतिक विकास तर खूप छोटी गोष्ट आहे पण व्यक्तिविकास आणि बुद्धीचा विकास याचा ताळमेळ युवकांनी साधला पाहिजे आणि हिंदू धर्म विरुद्ध जर कोणी बोललं तर त्याविरुद्ध आवाज उठविणार आहे पहिला सुरेश चव्हाण के असतो त्याप्रमाणे या गावात तरुणांनी तयार व्हावं आपली आर्थिक उन्नती तर प्रत्येकाने करावीच पण त्याबरोबरच देशासाठी धर्मासाठी लढणारा सुरेश चव्हाणके तयार व्हावा अशी अपेक्षा त्यानी व्यक्त करत गावाच्या विकास व  शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सदैव सुदर्शन राष्ट्रनिर्माण च्या वतीने योगदान केले जाणार असल्याचेही सुरेश चव्हाण के यांनी सांगितले
कार्यक्रमाच्या समारोपानंतर सुरेश चव्हाणके हेलिकॉप्टरने तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.याप्रसंगी गावातील ग्रामस्थ हिंंदू संघटनेचे कार्यकर्ते व शिक्षक,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
4 Comments

vega

  • Sep 27 2022 3:23:25:423PM

vega

  • Sep 27 2022 3:23:12:700PM

vega

  • Sep 27 2022 3:23:07:770PM

vega

  • Sep 27 2022 3:23:07:193PM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार