दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यापीठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न.
दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक 6 आणि 8 डिसेंबर 2021 रोजी आंतर विभाग बॅडमिंटन मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये विभागातील एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविला.
दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक 6 आणि 8 डिसेंबर 2021 रोजी आंतर विभाग बॅडमिंटन मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये विभागातील एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविला.अ विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा,महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,लातूर व दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच मुलींच्या स्पर्धेमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,लातूर, कॉक्सिट महाविद्यालय,लातूर व दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.त्याचबरोबर आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विद्यापीठातील एकूण चार विभागाच्या आठ संघांनी सहभाग नोंदविला.विद्यापीठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुलांच्या स्पर्धेत अ विभाग क विभाग ड विभाग यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये क विभाग,अ विभाग आणि ड विभाग यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.सदरील स्पर्धेतून विद्यापीठाचे संघ निवडण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले होते.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन,आशिष बाजपाई,शांतीलाल कुचेरिया,अशोक पाटील,हेमंत वोरा,चैतन्य भार्गव,निखील राठी,प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड, प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड,डॉ.पुनम नथानी,डॉ.पी.एन.देशमुख,डॉ.दीपक बच्चेवार,डॉ.भास्कर रेड्डी इत्यादी उपस्थित होते.सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.डाॅ.महेश बेंबडे,प्रा.निशिकांत सदाफुले,प्रा.ऋषिकेश मस्के आदींनी परिश्रम घेतले.