लातूर: महाराष्ट्र राज्य ग्राम्ररोजगार सेवक कर्मचारी संघटने मार्फत आज गांधी जयंतीचे औचित्य साधून लातूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये राज्यभरातील २८१४४ ग्रामपंचायतीनाध्ये काम करणार्यां कर्मचारी आणि सेवक याना सेवेत कायम करावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे. ग्रामपंचातीमध्ये सतांतर झाल्यांनतर सूड बुद्धीने त्याना कामावरून कमी करण्यात येते. यामुळे या कर्मचार्यावर अन्याय होत असून यामुळे सेवक आणि कर्मचारी याना सेवेत कायम करण्यात यावे.यामुळे ग्राम्ररोजगार सेवकाना सेवेत कायम करून होणार्या मानसिक आणि आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पांडुरंग मस्के, घाडगे इंद्रजीत, नंदकुमार अडसूळ, परमेश्वर बनसुडे, विशाल पवार, पद्माकर सूर्यवंशीं, राजेंद्र शिंदे, प्रकाश ढोरमारे, गोपाळ देडे, काकासाहेब देडे, गोपाळ पानढवळें, शरद सोनवणे, रामदास पवळे आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत. ग्रामपंचायत ग्राम सेवकाल कायम करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
Video link:
https://www.youtube.com/watch?v=w-iNX3guSpM