युवासेनेच्या आंदोलनास मिळाले यश,महाविद्यालय प्रशासन सहकार्याच्या भूमिकेत

युवासने मार्फत दयानंद विज्ञान महाविद्यालयामधून काही विद्यार्थी अर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांनी टी सी मागितली असल्याची भूमिका पालकांनी व्यक्त केली. युवासेनेच्या मध्यस्तीने 52 विद्यार्थ्यांना आपली टी. सी. मिळवली असून महाविद्यालय प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतल्याने हा तेढ सुटला

s.ranjankar
  • Aug 18 2021 6:55PM

लातूर: युवासने मार्फत दयानंद विज्ञान महाविद्यालयामधून काही विद्यार्थी अर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांनी टी सी मागितली असल्याची भूमिका पालकांनी व्यक्त केली. युवासेनेच्या मध्यस्तीने 52 विद्यार्थ्यांना आपली टी. सी. मिळवली असून महाविद्यालय प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतल्याने हा तेढ सुटला.  मागील अनेक महिन्यापासून  महिन्यापासून दयानंद महाविद्यालय प्रशासन विद्यार्थी व पालकांना ११ वी पास टि. सी संदर्भात सहकार्य करत नव्हते त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी हि अडचण घेऊन युवासेना सहसचिव प्रा. सुरज दामरे सर व युवासेना संघटक ऋषी शेटे यांची भेट घेतली व आपल्या सर्व अडचणी सांगितल्या.

यावेळी प्रा. दामरे सरांनी त्यांच्या सर्व अडचणी ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला व त्याच क्षणी प्रा. दामरे सरांच्या आदेशाने युवा सेना पदाधिकारी ऋषी आप्पा शेटे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय शिक्षण उपसंचालक मा. गणपतराव मोरे साहेबांना निवेदन देण्यात आले व मा. मोरे साहेबांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन युवासेना पदाधिकारी, कॉलेज प्रशासन व शिक्षण अधिकारी यांची बैठक घेतली.

या बैठकी मध्ये कॉलेज प्रशासनाने १२ वि फीस न घेता १५ ऑगस्ट च्या आत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन टि सी देण्याचे आश्वासन दिले. यामुळे युवासेना पदाधिकारी व विद्यार्थी पालक यांच्या वतीने मोरे साहेबांचा सत्कार करण्यात आला तसेच युवासेना मुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला या आनंदाने विद्यार्थी व पालकांनी युवासेना संपर्क प्रमुख प्रा. सुरज दामरे सर व युवासेना संघटक ऋषी शेटे यांचे मनापासून आभार मानले. यावेळी युवासेनेचे राहुल मातोळकर, ऋषीकेश शेटे, अमरदिप मानकोसकर, ऋषी बेळंबे, श्रीकांत धामनगावे, कबीर धुळगुंडे, शैलेश बिराजदार, हर्ष पवार व अन्य विद्यार्थी उपस्थित होते
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार