लातूर जिल्ह्यातील कोरोनानी मृतांचा आकडा प्रशासनाने लपवला- प्रेरणा होणराव

कोरोनाने जगभरात थैमान घातले होते यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला पण महाराष्ट्र शासनाने कोरोनानी मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती दडवली असल्याचा आरोप प्रेरणा होणराव यांनी केला आहे. कोरोना होऊन दुरुस्त झालेल्या रुग्णाचे दवाखान्याची बिल वापस द्यावे आणि महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत या रुग्णाचे नाव यादीत घालून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे.

s.ranjankar
  • Aug 18 2021 6:43PM
 
 लातूर: कोरोनाने जगभरात थैमान घातले होते यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला पण महाराष्ट्र शासनाने कोरोनानी मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती दडवली असल्याचा आरोप प्रेरणा होणराव यांनी केला आहे. कोरोना होऊन दुरुस्त झालेल्या रुग्णाचे दवाखान्याची बिल वापस द्यावे आणि महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत या रुग्णाचे नाव यादीत घालून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे.   जिल्ह्यातील कोरोना काळात झालेल्या मृत्यूची संख्या जिल्हा प्रशासनाने लपवली असून त्याचा खुलासा करावा, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून वंचित असलेल्या हजारो गोरगरीब रुग्णांना तात्काळ लाभ द्यावा अशी मागणी आज भारतीय जनता पार्टीच्या मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाच्या प्रती त्यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. 
   जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे काय म्हणाल्या पाहू भारतीय जनता पार्टीच्या मिडीया पॅनलिस्ट प्रेरणा ताई होनराव...
 
 
 
 
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार