लातूर: रायगड, रत्नागीरी, कोल्हापूरसह अनेक जिल्हयाला अतिवृष्टी होवून निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले. या पुरगस्तांना दिलासा देण्यासाठी लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने ५ हजार ब्लॅकेट, १० हजार सॅनिटरी नॅपकीनसह साफसफाई व सेवा कार्य करण्यासाठी भाजयुमोचे पथक पुरग्रस्त भागात रवाना झाले
गेल्या कांही दिवसापुर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी होवून पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने मानवासह प्राणी आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले. हजारो जणांना बेघर व्हावे लागले. या नैसर्गिक संकटात सापडलेल्यानां सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याची जाणीव लक्षात घेवून प्रदेश भाजपाच्या वतीने पुरग्रस्तांना आधार द्यावा मदत करावी अशा सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने ५ हजार ब्लॅकेट, १० हजार सॅनिटरी नॅपकीन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुरग्रस्त भागात निर्माण झालेल्या परिस्थित पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी साफसफाई व सेवाकार्यासाठी लातूर ग्रामीण जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या ३० जणांचे एक पथक रवाना झाले आहे.
पूरग्रस्त भागातील स्थानिकांनी भाजपा युवा मोर्चा लातूर येथील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांनी केलेल्या कार्याला आम्ही विसरणार नाही.