आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम साजरा करत आज जिल्हाभरात 7 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून याच सोबत वृक्षारोपण आणि संजय गांधी निराधार योजना अंतर्गत निराधाराना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी फ्रॉम भरून घेतले जाणार आहेत.
निलंगा शहरातील प्रमुख रस्ता हा कायम दुर्लक्षित राहत असल्याने त्या रस्त्याचे काम शिवसेना करून देणार आहे. राज्यभरात आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार 10 लक्ष वृक्षांचे लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याचे माहिती जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी दिली.