लातूर: मारुती काळे यांच्या रिक्षा वरती झाड कोसळून त्यांचा अपघाती मृत्यू झाला यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने आणि शिवसेना पदाधिकारी यांनी मिळून राजीव गांधी चौक येथे सामूहिक श्रद्धांजली वाहिली. मारुती काळे हे शिवसैनिक होते यामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मदत मिळावी याची मागणी शिवसेना लातूर शिवसेने मार्फत करण्यात आल्याची माहिती शिवाजी माने यांनी दिली.
काळे यांना एकूण तीन अपत्य असून त्यापैकी अपंग असलेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी शिवसेना घेणार असल्याची घोषणा यावेळी माने यांनी केली.