नांदगाव जेलमधील आरोपीची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार.
निलंगा तालुक्यातील जामगा येथील एक आरोपी लातूर जिल्हा कारागृहात असताना प्रकार घडला बाथरुममध्ये गळफास घेऊन २० वर्षीय इसमाने आयुष्य संपवलं
लातूर : लातूर कारागृहामध्येच एका कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निलंगा तालुक्यातील जामगा येथील एक आरोपी लातूर जिल्हा कारागृहात असताना प्रकार घडला. बाथरुममध्ये गळफास घेऊन २० वर्षीय इसमाने आयुष्य संपवलं. कारागृहात झालेल्या या आत्महत्येने जामगा गावात एकच खळबळ उडाली आहे बजरंग शेषराव पवार असं आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तो जामगा ता. निलंगा येथील रहिवासी होता. त्याच्याविरूध्द औराद शहाजणी पोलीस ठाण्यात ३६३,३६६ पोक्सो गुन्हा दाखल आहे, न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्याला १५ जुन ला लातूर जिल्ह्यातील साई रोड वरील जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आलं होतं. माझ्यावर असलेल्या आरोपावर जामीन मिळेल की नाही अशी त्याला भिती वाटत असावी ही शंका वर्तवली जात आहे .
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आज सकाळी पहाटेच्या सुमारास अचानक त्याने बाथरुममध्ये जात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केलं जात आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपीचे नातेवाईक यांनी काल रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला कारण कारागृहात बजरंग पवार यांनी केलेली आत्महत्या हि हत्या असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनास वेठीस धरले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी मध्यस्ती करत नातेवाईकांच्या सर्व शंकेचे निरसन केले.
आज सकाळी बजरंग पवार याचे शाव्विश्वेद्न करण्यात आले व त्त्याचे पार्थिव ताब्यात देण्यात आले.