मुंबईत सिमेंटच्या कंपनीत ड्रग्जनिर्मिती! पोलिसांच्या धडक कारवाईत ८ कोटींचे ड्रग्ज जप्त व आरोपी जिहाद्यांना अटक

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्स प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Sudarshan MH
  • Apr 29 2025 8:56AM

मुंबई: मुंबईतील ड्रग्ज प्रकरणे अनेकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय असतात. मागील दोन महिन्यांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर जवळ ड्रग्ज जप्त केल्याची घटना समोर आली होती. ड्रग्ज जप्ती प्रकरणात पोलिसांनी तुळजापूर येथून १४ जणांना अटक केली होती. महाराष्ट्रात काही महिन्यांपासून ड्रग्स प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हा चिंतेचा विषय बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका पोलिसांनी वसईतील एका सिमेंट कंपनीत छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी ४ किलो ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे. याचवेळी साकीनाका पोलिसांनी कारवाई करत ३ संशयितांनाही ताब्यात घेतले. जिहादी सादिक शेख, सिराज पंजवानी आणि सय्यद इराणी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहे. तर मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याचे सांगितले जात आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार