लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांविषयी हिंदूंमध्ये जागृतीची आवश्यकता; हिंदू जनजागृती समितीच्या पराग गोखलेंचे प्रतिपादन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिंचवड येथे ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

Sudarshan MH
  • Apr 17 2025 10:23AM

चिंचवड: सध्या जिहादी हिंदूंना, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, रेल्वे जिहाद, हलाल जिहाद अशा अनेक प्रकारे घेरत आहेत; पण हिंदू या सर्व प्रकारांपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ते धर्मांधांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे अस्तित्व नष्ट करून घेत आहेत. यामध्ये श्रद्धा वालकरचे उदाहरण असेल, कुंभमेळ्याला जाणार्‍या रेल्वेगाड्यांवर झालेले आक्रमण असेल, अशी अनेक उदाहरणे आहेत; म्हणून हिंदूंनी वेळीच जागरूक होऊन याविषयी जनजागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी केले. ते वाल्हेकर वाडी येथील ‘स्कायवन’ सोसायटीमधील कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाचा लाभ अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. यावेळी समितीचे नीलेश जोशी यांनी समितीच्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी ‘हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा’ही घेण्यात आली.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार