अखेर दीनानाथ मंगेशकर प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तनिषा भिसे यांच्या उपचारात हेळसांड करणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

Sudarshan MH
  • Apr 7 2025 6:15PM

पुणे: गर्भवती माता मृत्यु प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चर्चेत आहे. राज्य शासनाच्या पवार समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांचा उपाचाराभावी मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तनिषा भिसे यांच्या उपचारात हेळसांड करणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

त्यानंतर काही वेळातच मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध पक्ष संघटनांकडून होत होती. आता त्यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

आज दुपारी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्य शासनाने नेमलेल्या राधा किसन पवार यांच्या समितीच्या अहवालाची माध्यमांना माहिती दिली. यामध्ये त्यांनी तनिषा भिसे यांच्या मृत्यूसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर काही वेळातच डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला. रुग्णालयाची होत असलेली बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची कोणतीही जबाबदारी डॉ. सुश्रुत घैसास यांनी घेतली आहे की, नाही याबद्दल रुग्णालय प्रशासनाने अद्याप माहिती दिलेली नाही.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार