Chhaava VS Sikandar: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ला ५१ व्या दिवशी एका आठवड्यापूर्वी रिलीज झालेल्या सिकंदरपेक्षा जास्त प्रेक्षक मिळाले आहे. सलमान खानचा सिकंदर चित्रपट रिलीज झाल्यावर त्याचा फटका ‘छावा’ला बसेल आणि कमाईत घट होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र याच्या अगदी विरुद्ध आणि अनपेक्षित घडलं आहे.
‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला तर सिकंदर ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. ५१ व्या दिवशीही ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जात आहेत, तर दुसरीकडे सलमानच्या सिकंदरकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. सिकंदर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. विकी कौशलचा ‘छावा’ मात्र रिलीजच्या ७ आठवड्यानंतरही प्रेक्षकांचं थिएटर्समध्ये मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘छावा’ यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
एकंदरीत प्रेक्षकांची पसंती बदलत चालली असल्याचे दिसत आहे. काही मोजक्या चित्रपटांमधून इतिहासाची आवड प्रेक्षकांमध्ये पुन्हा निर्माण होतांना दिसून येत आहे. सत्य इतिहास समोर येत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आज ५१ व्या दिवशीही ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी बघायला मिळत आहे.