Shirur - कंद यांची माघार;महाविकास आघाडीत टेन्शन वाढले....

शिरूर हवेली मतदारसंघात भाजपा नेते प्रदीप कंद यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीत सरळ लढत होणार असल्याचे दिसत आहे.

अक्षय दोमाले
  • Nov 4 2024 4:56PM

 विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या अनुशंगाने भारतीय जनता पक्षाचे शिरुर हवेलीचे नेते प्रदिप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे. भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी प्रदिप कंद यांना चांगल्या पदावर संधी देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची ग्वाही दिल्यामुळे प्रदिप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. 

शिरुर हवेलीच्या मैदानात भाजप उमेदवार प्रदिप कंद यांनी तिस-यांदा उमेदवारी अर्ज माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर/ माऊली कटके यांना दिलासा मिळाला असुन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर हवेलीत प्रदिप कंद यांनी वरिष्ठांना मैत्रीपूर्ण लढत करावी म्हणून आग्रही होते. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप कंद यांची समजूत काढून अर्ज माघारी घेण्याची सूचना फोनवरून दिल्याने प्रदिप कंद अर्ज माघारी घेण्याचे ठरवले. 

प्रदीप कंद यांच्या उमदवारी अर्जाच्या निर्णयास विधानसभा संयोजक, शिरुर भाजपा अध्यक्ष, हवेली भाजपा अध्यक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाड्या व शिरूर हवेली मधील बहुतांशी पदाधिकाऱ्यांचा पाठींबा होता. तसेच जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी (दि. २ नोव्हेंबर) प्रदीपदादा कंद यांच्या समवेत शिरूर-हवेलीच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्या सोबत अतिशय सकारात्मक चर्चा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनंतर प्रदीप कंद यांनी फॉर्म मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिरूर हवेली मधील भाजपाची एकी अंखडीत राहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत प्रदीपदादांना साथ दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, असे भोंडवे यांनी यावेळी सांगितले. यामुळे शिरूर हवेलीत महाविकास आघाडी व महायुती सरळ लढत होताना दिसत आहे. प्रदिप कंद यांच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्यामुळे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा विजय निच्छीत मानला जात आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांची मतदार संघात ताकद वाढल्याचे चित्र पाहायला मिळणार यात शंका नाही

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार