पुणे -पर्वती मतदारसंघात यंदाची निवडणुक लढत प्रचंड चुरशीची ठरणार.भाजपाच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार कि तुतारी वाजणार ?

पर्वती मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे विद्यमान आमदारांच्या नाराजीचा फायदा तुतारीला होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अक्षय दोमाले
  • Oct 23 2024 1:12AM
पर्वती मतदार संघ हा गेले तीन वेळा भाजपचा आमदार असल्याने भाजपचा बालेकिल्ला बोल्ले जात होते.आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पर्वती मतदार संघातून भाजपाचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 28993 मताचे लीड मिळाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे.

पर्वती मतदार संघात यंदा तीन ताकदवर उमेदवार असल्याची चर्चा फोफावत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून अश्विनी कदम यांचे तिकीटसाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोल्ले जात आहे.कदम यांना मागील पंचवार्षिकमध्ये एकूण 60245 मतदान मिळाले होते.भाजपा कडून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.मिसाळ यांना मागील पंचवार्षिकमध्ये 97012 मते मिळाली  होती.

भाजपाचे नेते पुणे लोकसभा समन्व्यक श्रीनाथ भिमाले यांनी “मी लढणार आणि जिंकणार” अशी घोषणा दिलेली आहे. भिमाले यांचा पर्वती मतदार संघात मोठा जनसंपर्क असल्याचे बोल्ले जाते.समाजिक उपक्रम मोठ्याप्रमाणावर राबवत असल्याने भिमाले अपक्ष लढणार कि तुतारी हाती घेणार कि वरिष्ठाचा आदेश म्हणून पक्षाचे काम करणार यांच्या भूमिके कडे  नागरिकांचे लक्ष लागून आहे 

सूत्राच्या माहितीनुसार मिसाळ यांच्या मतदार संघात जनता वसाहत, आंबेडकर नगर, प्रेम नगर, दांडेकर पूल, अप्पर सुपर,लक्ष्मी नगर,पानमळा,गणेश मळा, शिवदर्शन, पर्वती दर्शन,पद्मावती, तळजाई, औद्योगिक वसाहत अशा बऱ्याच ठिकाणी विद्यमान  आमदार यांच्यावर  तीव्र नाराजी पाहायला मिळत असल्याने यंदा पर्वती मतदारसंघ भाजपाच्या हातातून जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार