महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, शिरूरमधून विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या कामावर जनतेचा विश्वास असल्याने त्यांची पुन्हा निवड होण्याची चर्चा आहे। लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांना जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल्याने अशोक पवार यांचे कार्य प्रभावी असल्याचे मानले जात आहे।
महायुतीकडून भाजपचे प्रदीप कंद यांच्या उमेदवारीवर जोरदार चर्चा सुरू आहे, कारण त्यांचे सामाजिक कार्य महत्त्वाचे आहे। तसेच, माऊली कटके यांच्याकडे उज्जेन महाकालेश्वर मंदिराच्या मोफत प्रवासाचे नियोजन केल्याने ते चर्चेत आले आहेत।
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून अशोक पवार तसेच महायुतीच्या तर्फे प्रदीप कंद यांचे नाव चर्चा होत असताना, माऊली कटके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटात जात असल्याची माहिती आहे। शिरूर मतदारसंघात "आमदार" म्हणून काम करणाऱ्याची आवश्यकता असल्याची चर्चा सुरु आहे, "स्टंटमॅन" नको, असे मत व्यक्त केले जात आहे।