ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास; एक लाखाच्या दंडाची तरतूद

महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Oct 5 2024 12:03AM

राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी पार पडली. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून आचारसंहिताही लागू शकते. अशातच होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 
प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तर, जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासह अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार