तळोदा येथे कारच्या धडकेत एक ठार..चालक फरार...

रस्ता चुकलेल्या वाहनाला रस्ता दाखवणाऱ्या इसमास काळ्या रंगाच्या होंडा सिटी गाडीने रात्रीच्या अंधारात तळोदा

Sudarshan MH
  • Aug 14 2023 7:15PM

       तळोदा येथे कारच्या धडकेत एक ठार..चालक फरार...


              रस्ता चुकलेल्या वाहनाला रस्ता दाखवणाऱ्या इसमास काळ्या रंगाच्या होंडा सिटी गाडीने रात्रीच्या अंधारात तळोदा अक्कलकुवा बायपास रस्त्यावर जबर ठोस दिली. या घटनेत रस्ता दाखवणाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी ता.१२ रोजी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली. त्यामुळे हकनाक एकास आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन होंडा सिटीत पसार होणारा तो कोण याचा पोलीस शोध घेत आहेत.
              याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा ते अक्कलकुवा बायपास रस्त्यावर गायत्री फिल्टर प्लांट च्या पुढे एम एच १२ केटी ४९९१ या काळ्या रंगाचा होंडा सिटी गाडीने शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दीपकगिरी हिम्मतगिरी गोसाई वय ४४ वर्ष राहणार जामनगर लालपुर रोड गुजरात यास जोराची ठोस देऊन दुखापत केली. त्यात दीपकगिरी गोसाई यांचा जागीच मृत्यू झाला. 
            या घटनेत दीपक गिरी हे गुजरात राज्यातून जळगाव येथे जात होते.मात्र गायत्री फिल्टर प्लॉट येथे त्यांचे वाहन रस्ता चूकले. त्यात वाहन रस्त्यावर घेऊन जाण्यासाठी ते रस्ता दाखवत होते. त्यात त्यांना
 काळ्या रंगाची होंडा सिटी गाडीने जबर ठोस दिली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारात ठोस मारून पळ काढणारा तो नेमका कोण याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी पोलिसांनी घटनास्थळावरून पोलीस स्टेशन येथे आणली आहे.मात्र वाहनात असलेले मिळून आले नाही.
                      त्यामुळे देवेंद्र नेनुजी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत. दरम्यान ही काळ्या रंगाची होंडा सिटी गाडीच्या वाहन चालक नेमका कोण याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे त्या अज्ञाताला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांना मिळाले आहे.
*कोट*
तळोदा-अक्कलकुवा रोडवरील बाय पास वर काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळाल्यावर लागलीच घटनास्थळी आम्ही भेट दिली व ठोस दिलेल्या वाहनातील चालक हा अपघात झाल्यानंतर वाहन जागेवरच सोडून लगेच फरार झाला असून त्याचा कसून शोध व तपास सुरू आहे.
          राहुलकुमार पवार
     पोलीस निरीक्षक, तळोदा
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार