“ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”- नारायण राणे

पुण्यामधील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना मागील काही दिवसांपासून दाखल करण्यात आले होते.

Sudarshan MH
  • Nov 15 2021 10:22AM

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बाबासाहेबांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यासहीत इतर मान्यवरांचाही समावेश आहे.

त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी – नितीन गडकरी

 

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले- उदयनराजे भोसले

इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत. pic.twitter.com/CAYAFXQziB

महाराष्ट्राची खूप मोठी हानी – नारायण राणे

मुरलीधर मोहोळ (पुण्याचे महापौर)

श्रीधर शिरोळे (आमदार)

Shivshahir Babasaheb Purandare is critical and undergoing treatment at the Deenath Mangeshkar Hospital. Please refrain from sharing otherwise.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

नितेश राणे (भाजपा नेते)

वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ????

प्रसाद लाड (भाजपा नेते)

रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचं निधन झालं. “आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार