धर्मांतरण विरोधी कायदयाच्या मागणी करीता विहिंपचे राज्यपालांना निवेदन

विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र तर्फे ईसाई मिशनरी तथा मुस्लीम मौलवीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष्यान पासून चाललेल्या अवैध धर्मांतरणाला रोखण्या करीता

Sudarshan MH
  • Oct 20 2021 12:23PM
विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र तर्फे ईसाई मिशनरी तथा मुस्लीम मौलवीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष्यान पासून चाललेल्या अवैध धर्मांतरणाला रोखण्या करीता कठोर केंद्रीय कायदा बनवण्याच्या मागणी करीता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. 
 संविधान सभेच्या सदस्यंनी धर्मांतरणाच्या वाढत्या घटनां प्रती वेळोवेळी चिंता व्यक्त करत याला थांबवण्या करिता केंद्रीय कायदा बनवण्या बाबत विचार व्यक्त केला होता. त्या वेळी संविधान निर्मात्यांनी आवश्यकता वाटल्यास कायदा बनवण्याचे आश्वासन दिले होते. 
संपूर्ण जगात भारताची ओळख हिंदू जीवन मुल्यां मुळे होते. धर्मांतरणा मुळे भारताचे जनसंख्य्कीय स्वरूप तसेच अस्मिता संकटग्रस्त आहे. या संबंधित अनेक अपराधिक षडयंत्र उघड झाले आहेत. एका घटनेत तर मुकबधीर मुलांना धर्मांतरित करून मानव बॉम्बच्या रुपात दुरुपयोगाची आशंका व्यक्त केली गेली. लव्ह जिहाद च्या निमित्त सतत होत असलेल्या हिंदू मुलींचे शोषण तसेच हत्यांच्या घटना चिंतादायक आहे. 
या विषयांची गंभीरता लक्षात घेता गेल्या काही वर्ष्यां मध्ये ११ राज्यांनी अवैध धर्मांतरण विरोधात अधिनियम बनवले आहेत. परंतु राष्ट्रव्यापी षड्यंत्राची गंभीरता लक्षात घेता या करीता कठोर केंद्रीय कायद्याची आवश्यकता असल्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून विहिंप ने केली.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, बजरंग दलाचे मुंबई क्षेत्र संयोजक देवेश मिश्रा, विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, कोकण प्रांत मंत्री श्री. रामुकाजी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार