“बापमाणूस” पुस्तक प्रकाशन समारंभ
माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपले वडील मा.श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेतून “बापमाणूस” हे पुस्तक लिहिले आहे
माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपले वडील मा.श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेतून “बापमाणूस” हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवार, दि. ०३ ऑगस्ट २०२१ ला दुपारी २.०० वाजता प्रेस क्लबच्या सभागृहात, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सव्यसाची पत्रकार व महाराष्ट्रातील चालते-बोलते विद्यापीठ मा.श्री. मधुकरराव भावे यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक मा.डॉ. रविंद्र शोभणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा.डॉ. गिरीश गांधी राहतील. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूर या पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजक आहेत.
मा.श्री. रणजीतबाबू देशमुख हे महाराष्ट्रातील मोठे व्यक्तिमत्व. पंचायत समितीच्या सभापती पदापासून महाराष्ट्रातील विविध खात्यांचे मंत्री, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे दोनदा अध्यक्ष, अनेक शैक्षणिक संस्थांची निर्मिती व असंख्य मित्रांचा गोतावळा अशी त्यांची ओळख आहे.