क्रिकेटनंतर आता राजकारणात इनिंग; केदार जाधवचा भाजपात प्रवेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sudarshan MH
  • Apr 9 2025 9:23AM

मुंबई: माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याने क्रिकेटनंतर आता राजकारणात आपली इनिंग सुरू केली आहे. केदार जाधव यांनी भाजपात प्रवेश केला असून, काल दि. ८ एप्रिल रोजी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपात प्रवेशानंतर केदार जाधव म्हणाला, की "२०१४ मध्ये केंद्रात भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून मला मिळालेले प्रेम आणि पाठिंबा व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती मला खूप प्रेरणादायी वाटते. माझे ध्येय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपासाठी जे काही छोटे योगदान देता येईल, ते करणार आहे. तसंच मला पूर्ण विश्वास आहे की, मला जी काही जबाबदारी मिळेल, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन", असं केदार जाधव यांनी सांगितलं.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार