मंदिरांच्या सुरक्षेसाठी व बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करावी; अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्ववाद्यांनी केली मागणी

रस्त्यावरून जाणारे दुचाकीवालेही आंदोलन पाहून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.

Sudarshan MH
  • Jan 9 2025 3:08PM
अहिल्यानगर: मागील आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणतांबा गावात महादेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. पुणतांबा येथे एकाच महिन्यातील ही दुसरी घटना असून १३ डिसेंबरला हनुमान मंदिरात, तर २३ डिसेंबरला महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे त्वरित अन्वेषण करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करावी, या मागण्यांसाठी अहिल्यानगर येथील दिल्लीगेट येथे सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
 
‘काश्मीरप्रमाणे महाराष्ट्रात हिंदूंची वाईट स्थिती होण्यास वेळ लागणार नाही’, असे म्हणून स्थानिक महिला आंदोलनात सहभागी झाली. पुणतांबा येथील हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरातील घटनांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी. आरोपी खरोखर मनोरुग्ण आहे का ? याची पडताळणी सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वतीने करावी. जिल्ह्यातील सर्व मंदिरांतील दानपेट्या चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील सर्व मंदिरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना होणार नाहीत. अशा आंदोलनात मागण्या होत्या.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार