फुले - शाहू - आंबेडकरी जनतेच्या वतीने जेलभरो सत्याग्रह जनआंदोलन

परभणी जिल्ह्यातिल हिंसाचार, हत्या, खोटे गुन्हे, संविधान शिल्प अवमान प्रकरणी दोषींवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा, सदर प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खून व मारहाण प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाचे शासनकृत पुनर्वसन सह आदी मागण्यांबाबत शासनाकडे राज्यभरातील आंबेडकरी जनतेने करूनही अद्यापपर्यंत मागण्या पूर्तता न झाल्याने तथा भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी संदर्भीय विधान करून केलेला आंबेडकरांचा अपमान या घटनेचा समाज बांधवांकडून तीव्र निषेध करत

Rohit Patil
  • Dec 20 2024 10:05AM
फुले - शाहू - आंबेडकरी जनतेच्या वतीने जेलभरो सत्याग्रह जनआंदोलन
 परभणी जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी चिखली मध्ये निदर्शने
चिखली : परभणी जिल्ह्यातिल हिंसाचार, हत्या, खोटे गुन्हे, संविधान शिल्प अवमान प्रकरणी दोषींवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा, सदर प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खून व मारहाण प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाचे शासनकृत पुनर्वसन सह आदी मागण्यांबाबत शासनाकडे राज्यभरातील आंबेडकरी जनतेने करूनही अद्यापपर्यंत मागण्या पूर्तता न झाल्याने तथा भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी संदर्भीय विधान करून केलेला आंबेडकरांचा अपमान या घटनेचा समाज बांधवांकडून तीव्र निषेध करत आज दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी चिखली शहरात समस्त फुले - शाहू - आंबेडकरी जनतेच्या वतीने जेलभरो सत्याग्रह जन आंदोलन करून ठाणेदार चिखली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
 
दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना उद्देशून पुढे नमूद केले आहे की, राज्यशासनाचे प्रमुख या नात्याने परभणी प्रकरणात आंदोलनकांवरील गुन्हे खारीज करावे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस दोषी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकरी समाजाची नव्हे तर संपूर्ण देशाची माफी मागावी तथा बुलढाणा जिल्हा आंबेडकरी जनतेच्या वतीने दिलेल्या मागण्यांची पूर्तता करून विधानसभा नागपूर अधिवेशनात घोषणा करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर या व अन्य मांगण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनाच्या शेवटी देण्यात आलेला आहे.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार