विद्यार्थिनीशी गैर वर्तन करणाऱ्या शिक्षकाला महाळुंगे MIDC पोलिसांकडून अटक...!!

खराबवाडी गावात एस.के कोचिंग क्लासेस घेणाऱ्या स्री लंपट सुशिल पुंडलिकराव कुऱ्हेकर या शिक्षकाने स्वतःच्या खाजगी शिकवणीत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीशी व तिच्या दोन अल्पवयीन मैत्रिणीशी अश्लील वर्तन केल्या प्रकरणी स्री लंपट शिक्षकाला गावातील नागरिकांनी चांगला चोप देऊन त्याला महाळुंगे MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Sudarshan MH
  • Nov 27 2024 9:57AM
खराबवाडी गावातील खाजगी शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनीशी गैर वर्तन करणाऱ्या लंपट शिक्षकाला महाळुंगे MIDC पोलिसांकडून अटक...!!
 
चाकण : खराबवाडी गावात एस.के कोचिंग क्लासेस घेणाऱ्या स्री लंपट सुशिल पुंडलिकराव कुऱ्हेकर या शिक्षकाने स्वतःच्या खाजगी शिकवणीत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीशी व तिच्या दोन अल्पवयीन मैत्रिणीशी अश्लील वर्तन केल्या प्रकरणी स्री लंपट शिक्षकाला गावातील नागरिकांनी चांगला चोप देऊन त्याला महाळुंगे MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून जुलै २०२४ पासून खराबवाडी गावातील एस.के कोचिंग क्लासेस नावाने खाजगी शिकवणी घेणारा सुशिल कुऱ्हेकर नामक स्री लंपट शिक्षक याने पिडीत फिर्यादी विद्यार्थिनीला क्लासमध्ये एकटीला थांबवून बायोलॉजि विषयात शिकवले जाणारे पुरुष अवयवांचे चित्र दाखवून व फिर्यादी विद्यार्थिनी समोर स्वतःची पॅन्ट काढून चुकीची जागा दाखवून तुला हा विषय आवडेल तू या विषयात लक्ष घाल व त्याने फिर्यादीला मला असे गिफ्ट दे असे एकटीस बोलून लज्जा उत्पन्न केली.
हा आरोपी यावरच थांबला नाही तर त्याने फिर्यादी विद्यार्थिनीच्या अल्पवयीन मैत्रिणी यांनाही अश्लील व्हीडीवो दाखवून सलगी करण्याचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्यां एका अल्पवयीन मैत्रिणीला ती एकटी असताना तिचे गालगुच्चे धरून तुला बॉयफ्रेंड आहे का ? असे खाजगीत बोलावून विचारले. या घटनेमुळे पिडीत तीनही विद्यार्थिनी भयभीत झाल्या फिर्यादी विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी सांगितला त्यावर स्थानिकांनी या स्री लंपट कलंकित नराधमाला चांगलाच चोप दिला. व त्याला महाळुंगे MIDC पोलीसांच्या ताब्यात दिले. या लंपट नराधमावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ७५,७९ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कमल १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सध्याची शहरी करणाची शैक्षणिक परिस्थिती बघता महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असा प्रकरणात शिक्षक यांना विद्यार्थ्यांचे दुसरे पालक म्हणून संबोधले जातात आणि तेच जर असे कारनामे करत असतील तर खरच घरातील मुलगी,स्री सुरक्षित आहे का? यावर मोठा प्रश्न उपस्थित केला जातो. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दामिनी पथक हे कागदावरच आहे कि काय? असाही प्रश्न उपस्थित होतो. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात महिला दक्षता कमिटी निर्माण केली आहे. पण तीही फक्त बोर्डवरच आहे त्यांची कोणतीही महिला सबलीकरणा संदर्भात निर्णय प्रक्रियासाठी बैठक होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ठोस पाऊले उचलून परिसरात होत असलेल्या महिला अत्याचार संदर्भातील घटनावर आळा घालण्यास उपाययोजना करायला हव्यात आणि महिलासाठीची पथके, कमिटी अजूनच दक्ष करायला हवी.
 
या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला हे करत आहेत.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार